‘अॅडव्हांटेज विदर्भ’च्या पहिल्यात दिवशी २५ उद्योजकांनी विदर्भात उद्योग सुरू करण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे सामंजस्य करार केले आहेत.
चंद्रपूर परिसरात ३ हजार ३०० कोटी रुपये खर्चाचा नवा सिमेंट उद्योग उभारण्यासाठी अंबुजा सिमेंट लिमिटेडचा मानस असून तसा करार कंपनीचे महाव्यवस्थापक व्योमेश बट्ट यांनी केला. अडीच हजार कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प भेल उभारणार असून तसा करार कंपनीचे संचालक ओ. पी. भुतानी यांनी केला. माणिकगड सिमेंट दीड हजार कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प चंद्रपुरात उघडणार असून कंपनीचे संचालक एस. के. मंडेलिया यांनी करार केला. अंबा आयर्न अँड स्टील कंपनीचा चंद्रपुरात एक हजार कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प होणार असून कंपनीचे संचालक कमल गोयल यांनी करार केला. धारिवाल इन्फ्रास्टक्चर सहाशे कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करणार असून कंपनीचे संचालक ए. के. गुप्ता यांनी करार केला. सूर्यलक्ष्मी कॉटन मिल्स पाचशे कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प नागपूर परिसरात सुरू करणार असून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक परितोष अग्रवाल यांनी करार केला. पृथ्वी फेरो चारशे कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प उघडणार असून कंपनीचे संचालक नरिमन सारिया यांनी करार केला.
सनफ्लॅग आयर्न अँड स्टिल भंडारा परिसरात ३३९.२७ कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करणार असून कंपनीचे प्रमुख रविभूषण भारद्वाज यांनी करार केला. हिंदालो इंडस्ट्रिज मौदा परिसरात ३१८ कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करणार असून कंपनीचे महाव्यवस्थापक राजेश पहाडी यांनी करार केला. ईश्वरकृपा डेव्हलपर्स नागपूर परिसरात ३११ कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करणार असून तसा करार कंपनीचे संचालक आबा भोगे यांनी केला. साई स्पिरीट नागपूर परिसरात १४० कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करणार असून कंपनीचे संचालक मनोज मोरयाणी यांनी करार केला. सगुणा फूड्स वर्धा परिसरात ११४ कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करणार असून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. बी. सुंदरराजन यांनी करार केला. आर. सी. प्लास्टो नागपूर परिसरात १०२ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प सुरू करणार असून कंपनीचे संचालक विशाल अग्रवाल यांनी करार केला.
 सूर्याबा स्पिनिंग मिल्स नागपूर परिसरात ९२.८० कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करणार असून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. के. अग्रवाल यांनी करार केला. आरएसआर मोहता हिंगणघाट परिसरात ४५ कोटी रुपयांचा वस्त्रोद्योग सुरू करणार असून कंपनीचे संचालक विनोदकुमार मोहता यांनी करार केला. रसोया प्रोटिन्स ९८ कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करणार असून कंपनीचे संचालक अनिल लोणकर यांनी करार केला. भूषण स्टिल लिमिटेड बुटीबोरीत १ हजार ३५० कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करणार असून कंपनीचे संचालक पदम अग्रवाल यांनी करार केला. शौर्य सीमलेस टय़ुब प्रा. लिमिटेड देवरी येथे तीनशे कोटी रुपयांचा सीमलेस पाईपचा प्रकल्प उभारणार असून कंपनीचे संचालक विजय वडेट्टीवार यांनी करार केला. अॅव्हगोल लिमिटेड बुटीबोरीत २९० कोटी रुपयांचा वस्त्रोद्योग सुरू करणार असून कंपनीचे संचालक स्लोगो मेनन यांनी करार केला. अमरावतीत व्हीएचएम इंडस्ट्रिज २८० कोटी रुपयांचा, श्याम इंडोफॅब २७३ कोटी रुपयांचा, यवतमाळमध्ये रेमंड युको डेनिम प्रा. लिमिटेड अडीचशे कोटी रुपये व बुटीबोरीत इनोव्हेटिव्ह टेक्सटाईल्स प्रा. लिमिटेड दीडशे कोटी रुपयांचा वस्त्रोद्योग सुरू करणार आहे. धामगणगावमध्ये विदर्भ सोया मिल्क प्रा. लिमिटेड शंभर कोटी रुपयांचा फूड प्रोसेसिंग तर २१ सेंच्युरी इन्फ्रास्टक्चर तीनशे कोटी रुपयांचा लॉजिस्टिक प्रकल्प सुरू करणार आहे. उद्योग खात्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी यांनी शासतर्फे सामंजस्य करार केला.