09 March 2021

News Flash

भरधाव मोटारीने चिरडले; मुलगी ठार, दोघे जखमी

काकाबरोबर देवदर्शनास निघालेल्या दोन चिमुकल्यांना भरधाव गाडीने उडविले. या अपघातात नाव्या प्रकाश सोनवणे (वय २) या मुलीचा मृत्यू झाला, तर शिरीष व सायली सोनवणे हे

| April 17, 2013 02:35 am

काकाबरोबर देवदर्शनास निघालेल्या दोन चिमुकल्यांना भरधाव गाडीने उडविले. या अपघातात नाव्या प्रकाश सोनवणे (वय २) या मुलीचा मृत्यू झाला, तर शिरीष व सायली सोनवणे हे दोघे गंभीर जखमी झाले. गाडी चालवणारी व्यक्ती अल्पवयीन असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या नेत्याचा तो मुलगा आहे. अपघातानंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना टीव्ही सेंटर परिसरात नागरिकांनी त्याच्या गाडीवर दगडफेक केली.
मंगळवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास हा प्रकार घडला. या वेळी परिसरात बराच वेळ तणाव होता. मोटारीने (एमएच २१ व्ही ५००) देवदर्शनास निघालेल्या तिघांना एकदम उडविले. या अपघातात नाव्याचा मृत्यू झाला.
गाडीचा वेग एवढा होता, की ती एका दुकानात घुसली. अपघातानंतर चालक पळून चालला होता. त्यामुळे नागरिक चिडले. काही जणांनी टीव्ही सेंटर चौकात दगडफेक केली. वाहनचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाच्या नेत्याचा मुलगा असल्याची चर्चा अपघातस्थळी होती.
 पोलिसांनीही वाहनचालकाचे नाव सांगण्यास टाळाटाळ केली. नंतर तो अल्पवयीन असल्याचे पुढे आले. ज्या वाहनाने अपघात झाला, त्याचा वाहनचालक गाडीत होता. मात्र, तो गाडी चालवत नसल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2013 2:35 am

Web Title: accident of car girl died two injured
टॅग : News
Next Stories
1 टँकरमागे ‘धावणारा’ तहानलेला जिल्हा!
2 जिल्ह्य़ात अनेक गावे तहानलेली; आराखडा मात्र २ ४ कोटींचा!
3 बांधकामे थांबविण्याचे आदेश
Just Now!
X