लोकसभा निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणीच्या कामात सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवडणूक भत्त्यात लक्षणीय वाढ करीत खुद्द निवडणूक आयोगाने महागाई वाढल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. महागाईची झळ निवडणूक कार्यात सहभागी झालेल्यांना बसू नये म्हणून गतवेळच्या तुलनेत निवडणूक भत्त्यात ५० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना भोजनाची पाकिटे अथवा आहार भत्ता दिला जातो. गतवेळी १०० रुपयांवर असणारा आहार भत्ता आता दीडपट वाढवून १५० रुपये करण्यात आला आहे. प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या धुराळ्यात महागाईचा मुद्दा हरविल्याचे दिसत असले तरी निवडणूक आयोगाने भत्त्यांतील वाढीने ही बाब ठळकपणे अधोरेखित केली. निवडणुकीचे काम करण्यास बहुतांश कर्मचारी नाखूष असतात. वाढीव भत्त्याद्वारे नको नकोसे वाटणारे हे काम हवेहवेसे करण्याचाही प्रयत्न दिसतो.
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान व मतमोजणीच्या कामात २३ हजार ५० कर्मचारी सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त ४,१९१ मतदान केंद्रांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मोठा पोलीस फौजफाटा तैनात होईल. या कामासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यास निवडणूक भत्ता दिला जातो. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. या सुधारित दराने यंदा सर्वाना निवडणूक भत्ता मंजूर केला जाईल. गतवेळच्या भत्त्याची तुलना केल्यास यंदा त्यात चांगलीच वाढ झाल्याचे लक्षात येते. क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय दंडाधिकाऱ्यांना गतवेळी एकत्रितपणे ८०० रुपये भत्ता दिला गेला होता. त्यात यंदा ७०० रुपयांनी वाढ झाली. मतदान केंद्राध्यक्ष व मतमोजणी पर्यवेक्षक यांचा भत्ता गतवेळच्या तुलनेत १०० रुपये, मतदान अधिकारी व मतमोजणी सहायक यांचा भत्ता ७५ रुपये तर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात प्रति दिन ५० रुपयांनी वाढ झाली आहे.
मतदान व मतमोजणीच्या आधी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणारे, मतदानाचे साहित्य ताब्यात घेणारे तसेच मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष कर्तव्यार्थ उपस्थित राहणारे व राखीव अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपरोक्त दराने हा भत्ता मिळेल. तथापि, मतदान, मतमोजणी भत्त्यांचे वाटप करणारे, त्याबाबत वेतन पावती नोंदवहीचे काम करणाऱ्या लेखा कर्मचाऱ्यांना, मतदान अधिकारी व मतमोजणी साहाय्यकांना उपरोक्त दराने भत्ता मिळणार नाही.
मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रावर निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते. यामुळे संबंधितांच्या भोजनाची वा अल्पोपाहाराची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, मतदान केंद्रांची चार हजारहून अधिक असणारी संख्या लक्षात घेतल्यास सर्वच ठिकाणी ही व्यवस्था करणे जिकिरीचे ठरू शकते. यामुळे निवडणूक शाखेला ही व्यवस्था करणे अशक्य झाल्यास प्रति दिन प्रति व्यक्ती १५० रुपयांप्रमाणे आहार भत्ता रोख स्वरूपात दिला जाणार आहे.
मतदान व मतमोजणीच्या दिवशी निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी, फिरती पथके, होमगार्ड, ग्रामरक्षक दल, वनरक्षक दल, एनसीसी छात्र, माजी सैनिक अधिकारी, केंद्रीय निमलष्करी दल अधिकारी व कर्मचारी यांना १५० रुपयांच्या मर्यादेत भोजन पाकिटे अथवा सौम्य अल्पोपाहार पुरविण्यात यावा अथवा त्याऐवजी प्रत्येकी १५० रुपयेनुसार आहार भत्ता रोखीने देण्याची सूचना करण्यात आली आहे.
निवडणूक भत्त्याचे वाढीव दर

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
water Mumbai, water distribution,
‘चावीवाले’ निवडणूक कामात, पाणी कोण सोडणार?
BJP needs support from MNS A look at Raj Thackeray stance on participation in the Grand Alliance
भाजपला मनसेची साथ हवी ; महायुतीतील सहभागाबद्दल राज यांच्या भूमिकेकडे लक्ष
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?