News Flash

दोन खुनाच्या गुन्ह्य़ात फरार असलेल्या आरोपीस अटक

िपटय़ा मारणे व शरद मोहोळच्या टोळीतील दोघांच्या खुनात सहभागी असल्याचा आरोप असलेला व फरार झालेला गणेश मारणे टोळीतील सराईत गुन्हेगार विठ्ठल महादेव शेलार (वय २४)

| February 14, 2013 02:15 am

िपटय़ा मारणे व शरद मोहोळच्या टोळीतील दोघांच्या खुनात सहभागी असल्याचा आरोप असलेला व फरार झालेला गणेश मारणे टोळीतील सराईत गुन्हेगार विठ्ठल महादेव शेलार (वय २४) याला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. खंडणी विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईत या गुन्हेगाराकडून एक पिस्टल व गावठी कट्टाही जप्त करण्यात आला आहे.
शेलार याच्यासह त्याचा साथीदार रोहीत राजकुमार वैराट (वय १९, रा. देहुगाव) यांना अटक करण्यात आली आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांना या गुन्हेगारांबाबत माहिती मिळाली. शेलार हा पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून चांदणी चौकातून पुण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली. शेलार हा िपटय़ा मारणे खून खटल्यातील आरोपी असून सध्या तो न्यायालयातून फरार आहे. त्याचप्रमाणे शरद मोहोळ टोळीतील दोघांचा खून करून त्यांचे मृतदेह जाळून टाकल्याच्या प्रकरणातही शेलार आरोपी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 2:15 am

Web Title: arrest to suspect who had case on two murdered case
टॅग : Arrest
Next Stories
1 खंडित विजेमुळे शहराच्या पाणी पुरवठयात व्यत्यय
2 पत्नीच्या खुनाबद्दल पतीला जन्मठेप
3 सिव्हील हडकोत तीन बंद घरांमध्ये चोरी
Just Now!
X