सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) व माकपचे नेते म्हणून कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील यांनी त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्ताने जेएनपीटी कामगार वसाहतीत कार्यक्रमात देहदान करण्याची घोषणा केली. भूषण पाटील गेली १६ वर्षे जेएनपीटी बंदराच्या विश्वस्त मंडळात कामगार विश्वस्त म्हणून काम करीत आहे. पाटील यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या पेण तालुक्यातील गोगदे येथील सवरेदय देहदान मंडळाकडे मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प अर्ज दाखल केला.