जिल्ह्य़ात उद्या (रविवारी) व २३ फेब्रुवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात १ हजार १२५, तर शहरी २७७ बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. पालकांनी आपल्या बालकांना पोलिओचा डोस पाजावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी केले.
ग्रामीण भागात १ लाख ३७ हजार ९०१, तर शहरी भागात ८८ हजार ८४ बालकांना डोसची व्यवस्था केली आहे. १२३ मोबाईल पथक, १४९ फिरते व ३७ रात्रपाळी पथक स्थापन केले आहे. शहरात ५८ हजार बालकांना डोस पाजण्यात येणार आहे. मनपाचे सर्व विभाग यात सहभागी होणार आहेत. २३० खासगी दवाखाने, शासकीय रुग्णालय, महत्त्वाची ठिकाणे, वीटभट्टी, झोपडपट्टी, बसस्थानक, रेल्वेस्थानक या ठिकाणी बूथची व्यवस्था केली आहे.
‘जीवनदायी’ चा २८६ जणांना लाभ
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ जिल्ह्य़ात २८६ रुग्णांना देण्यात आला. यासाठी सरकारने ७७ लाखांचे वाटप केले. या योजनेंतर्गत नवीन रुग्णालयांचा समावेश केला आहे. परभणीसह नांदेड व औरंगाबाद येथीलही रुग्णालयात याची सेवा मिळू शकेल.