म्हात्रे पुलावरून जात असलेल्या उंटाचा पाय फुटलेल्या पाइपमध्ये अडकल्याने बुधवारी संध्याकाळी पुलावरील वाहतूक ठप्प
झाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे एक तासांच्या प्रयत्नांनंतर उंटाचा पाय
पाइपमधून बाहेर काढला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
संध्याकाळी सहाच्या सुमारास उंटाचा मालक या उंचाला घेऊन म्हत्रे पुलावरून चालला होता. पुलावरील पाणी वाहून जाण्यासाठी लावलेल्या व फुटलेल्या एका पाइपमध्ये या उंटाचा पाय अडकला. विविध प्रयत्न करूनही उंटाचा पाय बाहेर काढत येत नव्हता. पुलाच्या मधोमधच उंट थांबल्याने पुलावरून जाणारी वाहतूकही थांबली. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. याबाबत अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पुलाच्या खाली मोठी शिडी लावली. खालच्या बाजूने उंटाचा पायावर दाब देऊन पाय बाहेर काढण्यात आला. त्यासाठी सुमारे तासभर प्रयत्न करावे लागले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2013 रोजी प्रकाशित
म्हात्रे पुलावर पाइपमध्ये उंटाचा पाय अडकून वाहतुकीचा खोळंबा
म्हात्रे पुलावरून जात असलेल्या उंटाचा पाय फुटलेल्या पाइपमध्ये अडकल्याने बुधवारी संध्याकाळी पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे एक तासांच्या प्रयत्नांनंतर उंटाचा पाय
First published on: 14-02-2013 at 02:17 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Camle leg struct in pipe on mhatre bridge