आयकर विभागाच्या कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी लावून देतो, असे म्हणून तिघांकडून ६ लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या ठगाविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली.
शिवानंद बद्रीनाथ मुढे (वय २८, हनुमाननगर, औरंगाबाद) यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. आयकर कार्यालयात शिपाई म्हणून कामास लावतो, असे सांगून आरोपी किशोर अशोक जगताप (सिल्लोड, जि. औरंगाबाद), त्याच्या सोबत असलेला गायकवाड व अन्य अनोळखी लोकांनी फिर्यादी मुढे, अनिल सांगळे व समाधान मांटे या तिघांकडून प्रत्येकी दोन लाख असे एकूण ६ लाख रुपये घेतले. गेल्या वर्षी २० फेब्रुवारी रोजी बाबा पेट्रोल पंपाजवळ पंजाब नॅशनल बँकेनजीक हा प्रकार घडला. या प्रकरणी मुढे यांनी शुक्रवारी तक्रार दिली.