मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे येत्या रविवारी (दि. १६) येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्’ाातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत जिल्हयाचे संपर्कमंत्री सतेज पाटील उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी चर्चेसाठी तालुकानिहाय नियोजन केले आहे.
रविवारी सकाळी साडेआठ ते ९ कराड शहर, साडेनऊ ते दहा कराड उत्तर विधानसभा मतदार संघ, दहा ते साडेदहा कराड दक्षिण, साडेदहा ते अकरा पाटण, ११ ते साडेअकरा सातारा, जावली, साडेअकरा ते १२ कोरेगाव, १२ ते साडेबारा वाई, खंडाळा, महाबळेश्वर, साडेबारा ते १ फलटण, १ ते २ माण व खटाव यानुसार मुख्यमंत्री जिल्’ाातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून दुपारी ४ वाजता कापील (ता. कराड) येथील २४ बाय ७ नळपाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनास उपस्थित राहणार आहेत. ठरलेल्या वेळेत संबंधित तालुक्यातील काँग्रेस कमिटय़ांच्या पदाधिकाऱ्यांनी विकासकामांबाबतच्या लेखी निवेदनासह येथील शासकीय विश्रामगृहात हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2013 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्री उद्या घेणार मतदारसंघनिहाय आढावा
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे येत्या रविवारी (दि. १६) येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्'ाातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत जिल्हयाचे संपर्कमंत्री सतेज पाटील उपस्थित राहणार आहेत.

First published on: 15-06-2013 at 01:44 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm will take review with constituency wise on tomorrow