24 November 2020

News Flash

शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत न्यायालयाच्या निर्देशानुसार जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा

| February 12, 2014 09:15 am

आम आदमी पक्षाची तक्रार
शिक्षण खात्यातील   भ्रष्टाचार  न्यायालयाच्या    निदर्शनास आणून देत न्यायालयाच्या निर्देशानुसार   जबाबदार   अधिकाऱ्यांवर   गुन्हा    नोंदविण्यास    भाग   पाडणाऱ्या इकबाल   अहमद   या  येथे    हातमजुरी  करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांला   जीवे   मारण्याची   धमकी   देत   हल्ला    करण्यात आला.
 या   हल्ल्यामागे    शिक्षण    खात्यातील    भ्रष्टाचार प्रकरणात    गुन्हा दाखल झालेले अधिकारी असल्याचा आरोप    आम    आदमी   पक्षाच्या वतीने    करण्यात    आला  आहे. जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांना पक्षातर्फे यासंदर्भात निवेदन देण्यात आले. इकबाल अहमद यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. भ्रष्ट व गुंड प्रवृत्तीविरोधात तक्रार केल्याने हा हल्ला झाला असून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा अशा व्यक्तींमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडू शकते अशी भीती पक्षाचे शहर समन्वयक वसिम शेख, शहर सचिव मनोज बडगुजर, शहर सहसचिव डॉ. संजय पिंगळे, डॉ. एस. मलिक आदींनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2014 9:15 am

Web Title: corrupt education officer is responsible for that offense 2
टॅग Dhule
Next Stories
1 पूर्व प्राथमिकच्या प्रवेशासाठी पालकच रांगेत
2 पथदीप बंद असल्याने पालिकेविरोधात मनमाडकर आक्रमक
3 सलग दुसऱ्यांदा एक कोटीचा निधी परत
Just Now!
X