वाळू उपशासाठी जादा बोटी लावल्याप्रकरणी प्रशासनाने बोटी काढण्यासाठी नोटिसा बजावूनही त्याला दाद न दिल्याने सैदापूर, कोपर्डे हवेली, बेलवडे हवेली, वराडे, तासवडे, कोडोली, वहागाव, खोडशी येथून २४ बोटी जप्त करण्यात आल्या. प्रशासनाकडून अचानक केलेल्या कारवाईमुळे वाळूसम्राटांना चांगलाच दणका बसला आहे. महसूल प्रशासनाच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून, कोणाचीही गय न करता सक्त कारवाईची न्याय्य अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
आतापर्यंत अवैध वाळू उपसा, अवैध वाहू वाहतूक यातून कोटींच्या घरातील दंड संबंधितांना अकारण्यात आला आहे. वाळू उपशासाठी जादा बोटी लावल्याप्रकरणी बोटी काढण्यास नोटिसा देऊनही त्याला दाद न दिल्याच्या पाश्र्वभूमीवर त्या बोटी जप्त करण्याची कारवाई प्रशासनाने केली. सैदापूर-४, कोपर्डे हवेली ४, बेलवडे हवेली ६, वरोडे १, तासवडे ३, कोडोली २, वहागाव २, खोडशी २ अशा २४ बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. त्या बोटी येथील मार्केट यार्ड परिसरातील धान्य गोदाम परिसरात आणून ठेवण्यात आल्या आहेत.