03 June 2020

News Flash

देव दीनाघरी धावला..

सर्वे सुखीन: संतू, सर्वे संतू निरामया, शिवभावे जीवसेवा या व्रताचा अंगीकार करणाऱ्या शेगावच्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज संस्थानकडून लोककल्याणाचे विविध ४२ सेवाप्रकल्प राबविले जातात. दीन,

| November 13, 2012 03:42 am

सर्वे सुखीन: संतू, सर्वे संतू निरामया, शिवभावे जीवसेवा या व्रताचा अंगीकार करणाऱ्या शेगावच्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज संस्थानकडून लोककल्याणाचे विविध ४२ सेवाप्रकल्प राबविले जातात.
 दीन, दु:खीतांना सुखी करण्याचा प्रयत्न, अन्न, वस्त्र, निवारा व अध्यात्म जीवन ही गजानन महाराजांची जीवनविषयक दृष्टी व मंत्र होता. त्याच पायाभूत विचारसरणीच्या आधारावर संस्थानचे कृतिशील कार्यक्रम सुरू असतात.
यावर्षीदेखील संस्थानच्या वतीने सातपुडय़ाच्या कुशीत अठराविश्वे दारिद्रय़ात गुजराण करणाऱ्या आदिवासी बांधवांना कापडासह मिष्टान्न वाटप करण्यात आले.
संस्थानने महाराजांच्या शिकवणीनुसार अंधारयात्रेत जीवन जगणाऱ्या आदिवासींच्या जीवनात दीपावलीची तेजोमय ज्योत पेटविण्याचा प्रयत्न केला. संस्थानच्या गोड दिवाळीने आदिवासी भारावून गेले. त्यांनी कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील व संस्थानबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  
श्री गजानन महाराज संस्थानचे  सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात सेवाप्रकल्प आहेत. त्यापैकी एक प्रकल्प म्हणजे आदिवासी बांधवांची सहकुटुंब दिवाळी साजरी करणे होय.
सातपुडय़ातील पर्वतरांगामध्ये वसलेल्या वसाली, अंबाबरवा, चुनखडी, शेंबा, मांगेरी, गुमठी व भिंगारा या आदिवासी भागात सुमारे ५१ हजार आदिवासींना मिष्ठान्न व कपडय़ाचे वाटप केले जाते. त्यात सर्व लहान थोरांचा समावेश असतो. आदिवासींच्या आवडीनुसार धोतर, साडी, पैजामा, लुगडी, पंजाबी ड्रेस, फ्रॉक, टी शर्ट व बरमुडा आदी नवीन कपडय़ांचे वाटप करण्यात येते.
श्रीक्षेत्र नाशिक व क पिलधारा येथेही असाच आदिवासी दिवाळी महोत्सव साजरा झाला. यावर्षी महाप्रसाद भोजनासह या कापड व मिठाईचे वितरण करून आदिवासींच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलविण्यात आला.
 आनंद आखाडाचे  सागरानंद महाराज, गणेशानंद महाराज, स्वामी केशवानंद महाराज, श्री रामकृष्ण आरोग्य संस्था त्र्यंबकेश्वरचे श्रीखंडानंद महाराज व संस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले.  संत गजानन महाराज हे अन्न गोळा करून भूकेल्यांना खाऊ घालायचे. दुर्धर रोग जडलेल्या व्याधीग्रस्तांना व्याधीमुक्त करायचे. संपूर्ण जग सुखी करण्याचा त्यांचा हा उद्योग हीच ईश्वराची खरी सेवा होय. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत कृतीने गजानन महाराज संस्थान चालवित आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2012 3:42 am

Web Title: diwali feature god comes in poors house
टॅग Diwali
Next Stories
1 विकास खुराणा व सुरेशचंद्र राठोर यांना स्मिता पाटील पुरस्कार
2 चंद्रकांत वानखडे, डॉ. विलास डांगरे यांना आज पुरस्कार
3 संशोधन व्यक्तिगत प्रगतीसाठी करू नका -डॉ. टी रामास्वामी
Just Now!
X