उजाड झालेल्या खाण परिसरात २ टक्के शेष रकमेतून वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या सूचना अप्पर मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीला राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी उपस्थित होते.
उत्खनन करताना झालेल्या दुर्घटनेची माहिती त्वरित देणे, वाळू घाटाची खोली मोजण्यासाठी खाजगी सेवा घेणे, उत्खनन करणाऱ्या संस्थेचा प्रतिनिधी जिल्हा समितीवर घेणे, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. नागपूर विभागात नझूल जमिनाच्या पट्टय़ाचे नूतनीकरण कामात नागपूर विभागाने उत्तम कामगिरी केल्याने विभागीय आयुक्त वेणुगोपाल यांचे स्वाधिन क्षत्रीय यांनी अभिनंदन केले.