देशातील सेवानिवृत्त औद्योगिक कामगार, कर्मचारी महामंडळातील व कापड मिलमधील कर्मचाऱ्यांना मिळणारी १९९५ ची ईपीएफ पेन्शन अतिशय कमी आहे. देशातील १४ लाख कामगारांना दर महिन्यात फक्त ५०० रुपये पेन्शन मिळत आहे. एक हजारपेक्षा कमी पेन्शन ७ लाख कामगारांना मिळत आहे. ४० ते ३०० रुपये ईपीएफ पेन्शन मिळत आहे. या पेन्शनमध्ये दोन वेळचे जेवणही घेता येत नाही. या पेन्शनमध्ये महागाई वाढली तरी वाढ होत नाही.
दरम्यान राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकचे सचिव मुकुं द मुळे यांनी ईपीएफ पेन्शन कमीत कमी ५ हजार रुपये मिळावी यासाठी सतत पाठपुरावा केला. केंद्रीय श्रममंत्री भारत सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे गंभीर मुद्दा प्रकर्षांने समोर आला आहे. या संदर्भात लेखी पत्र केंद्रीय श्रममंत्री कोडिकुन्नीले सुरेश यांनी इंटकला पाठविले आहे. सर्व कामगारांना मासिक पेन्शन किमान ५ हजार रुपये मिळावे असा पाठपुरावा केला आहे. तसेच त्याला महागाई भत्ता जोडून मिळावा, असेही म्हटले आहे. याचा सातत्याने पाठपुरावा करून इंटकने अनेक आंदोलने केली आहेत. इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजीव रेड्डी यांनीही यासाठी पुढाकार घेतला होता.