29 March 2020

News Flash

शशी जोशी अभिनय स्पर्धेत ‘फेस टू फेस’ सर्वोत्तम

‘नाटय़ाभिमानी’ संस्थेतर्फे आयोजित शशी जोशी स्मृती अभिनय स्पर्धेत अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सात नाटिकांमधून ‘फेस टू फेस’ या नाटिकेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.

| January 16, 2013 01:39 am

‘नाटय़ाभिमानी’ संस्थेतर्फे आयोजित शशी जोशी स्मृती अभिनय स्पर्धेत अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सात नाटिकांमधून ‘फेस टू फेस’ या नाटिकेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. या स्पर्धेची अंतिम फेरी अलीकडेच गडकरी रंगायतन येथे मोठय़ा उत्साहात पार पडली. या वेळी अभिनेत्री विशाखा सुभेदार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
  याखालोखाल ‘सूर्य शक्तीचा विजय असो’ नाटिकेने द्वितीय, तर ‘वुई आर फॅमिली’ नाटिकेने तृतीय क्रमांक, सवरेत्कृष्ट दिग्दर्शनासाठी स्निग्धा सबनीस यांनी प्रथम, तर रुचिता पाटणकर यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
सवरेत्कृष्ट अभिनयासाठी मुलांमधून ऋग्वेद बापट यास प्रथम, तर प्रथमेश कवडे व अर्चना शर्मा यांना द्वितीय क्रमांक व मुलींमधून सानिका जोशी हिने प्रथम, तर सई जोशी व ऋचा पेंडसे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.‘भातुकलीचा खेळ’ या नाटिकेसाठी रुपेश चव्हाण यांना सवरेत्कृष्ट लेखनाच्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
 ‘प्रेक्षक पसंती’ या गटात ‘सूर्य शक्तीचा विजय असो’ नाटिकेने बाजी मारली. अंतिम फेरीसाठी प्रा. मीना गुर्जर, मंजिरी शेंडे आणि प्रसाद ठोसर यांनी काम पाहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2013 1:39 am

Web Title: face to face came first in shashi joshi acting competition
Next Stories
1 काळा तलाव महोत्सवात ‘विचारांचे-सूर’
2 डोंबिवलीत शतचंडी याग
3 विवेकानंद जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य शोभा यात्रा
Just Now!
X