03 June 2020

News Flash

दिवाळीसाठी रेल्वेच्या पाच विशेष गाडय़ा

दिवाळीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने पुणे-निजामुद्दीन, पुणे-पटना, पुणे- नागपूर, पुणे-सोलापूर या मार्गावर पाच विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-निजामुद्दीन गाडी १३ नोव्हेंबरला रात्री

| November 13, 2012 03:13 am

दिवाळीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने पुणे-निजामुद्दीन, पुणे-पटना, पुणे- नागपूर, पुणे-सोलापूर या मार्गावर पाच विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-निजामुद्दीन गाडी १३ नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता पुणे स्थानकाहून सुटणार आहे. पुणे-पटना एक्स्प्रेस १६ नोव्हेंबरला रात्री पावणेअकरा वाजता पुणे स्थानकावरून सुटेल. या गाडीची द्वितीय श्रेणी अनारक्षित आहे. पुणे- नागपूर ही गाडी १७ नोव्हेंबरला पहाटे पाच वाजून २० मिनिटांनी सोडण्यात येणार आहे. पुणे-सोलापूर ही गाडी १८ नोव्हेंबरला दुपारी सव्वाचार वाजता पुणे स्थानकाहून सुटेल. पुणे-नागपूर ही दुसरी गाडी २० नोव्हेंबरला दुपारी सव्वादोन वाजता सुटेल.
पुणे-पटना या गाडीचे सर्व डबे द्वितीय श्रेणीतील अनारक्षित असणार आहेत. त्यामुळे या गाडीसाठी योग्य वेळेत तिकिटे काढावीत, असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2012 3:13 am

Web Title: five special trains in the season of diwali
Next Stories
1 बारामती-दादर मार्गावरही आता एसटीची ‘शिवनेरी’
2 रक्तपेढीच्या कामाची महापौर, आयुक्तांकडून पाहणी
3 कंपनीतील यंत्रसामुग्री हलवण्यास मज्जाव
Just Now!
X