हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ, तसेच गोविंदभाई श्रॉफ यांचे सहकारी, आचार्य विनोबा भावेप्रणीत भूदान, ग्रामदान, सवरेदय आंदोलनाचे नेते, लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे सहकारी डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांचा वसमत येथे ९३व्या जन्मदिनी नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात गोविंदभाई श्रॉफ मानवी मूल्य संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. अग्रवाल यांना सन्मानपत्र, तसेच २५ हजार रुपयांचा कृतज्ञता निधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानप्रकाश मोदाणी, डॉ. सुगन बरंठ, जयंत मठकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सवरेदयी कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांचाही सत्कार या वेळी करण्यात आला. ज्येष्ठ नेते पन्नालाल सुराणा, मानवलोकचे डॉ. द्वारकादास लोहिया, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष व्यंकटेश काब्दे, सेवाग्राम प्रतिष्ठानचे सचिव प्रा. डॉ. श्रीराम जाधव, प्राचार्य प्रताप बोराडे, स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर वाईकर, अमर हबीब, प्रा. विजय दिवाण, भीमराव बोंडारे, अॅड. रामचंद्र बागल आदी उपस्थित होते.