यावर्षीपासून पहिल्यांदाच राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑनलाइन करण्यात येणार असून २४ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. नागपुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढली असताना जागा कमी आणि अर्ज जास्त अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. संस्थेत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १२०० जागा उपलब्ध असून यावर्षी संस्थेमध्ये प्रथमच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून तशा सूचना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना देण्यात आल्या आहेत.
२४ जून ४ जुलै पर्यत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. यानंतर ९ जुलै रोजी ऑनलाइन यादी पसिद्ध केली जाणार असून १० जुलैला काही तक्रारी किंवा सूचना असल्यास त्यासाठी वेळ देण्यात आला आहे आणि ११ जुलैला यादी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याच दिवशी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ग्राामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया कठीण असली तरी त्यांना याच पद्धतीने प्रवेश घ्यावा लागणार आहे. ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संस्थेमधून ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची व्यवस्था करण्यासंदर्भात विचार सुरू असून त्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी अधिष्ठाता प्रदीप लोणारे यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावी किंवा बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विज्ञान किंवा वाणिज्य शाखेकडे वळत असले तरी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा मोठय़ा प्रमाणावर कल आहे. नागपूर जिल्ह्य़ात मौदा, सावनेर, काटोल, पारशिवणी, नरखेड, रामटेक, कामठी, उमरेड, कुही, भिवापूर, हिंगणा, इंदोरा या भागात आयटीआय महाविद्यालये असून या ठिकाणी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी व्यवसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. आज विविध औद्योगिक कंपन्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम केल्याचे प्रमाणपत्र आणि अनुभव मागतात त्यामुळे अनेक युवकांचा व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे कल वाढला आहे. अतिशय कमी पैशात विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये प्रशिक्षण दिले जात असले तरी केवळ गोरगरीब कुटुंबातील मुलेच प्रवेश घेतात असे नव्हे तर मध्यमवर्गीय युवकही मोठय़ा प्रमाणात येत असतात. आज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असल्याचे लोणारे यांनी सांगितले.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Record Number of Students Register for MHTCET
अभियांत्रिकी, औषधनिर्माण प्रवेशासाठी स्पर्धा, सीईटीसाठी किती विद्यार्थ्यांची नोंदणी?
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?