04 August 2020

News Flash

मलकापूर रोल मॉडेल म्हणून नावारूपास येईल- मुख्यमंत्री

कराडच्या मार्केट यार्ड ते मलकापूर मार्गे नांदलापूर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे मलकापूरच्या विकासाला चालना मिळणार असून, मलकापूर शहर रोल मॉडेल म्हणून नावारूपास येईल असा

| November 27, 2012 10:09 am

 कराडच्या मार्केट यार्ड ते मलकापूर मार्गे नांदलापूर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे मलकापूरच्या विकासाला चालना मिळणार असून, मलकापूर शहर रोल मॉडेल म्हणून नावारूपास येईल असा विश्वास व्यक्त करताना मलकापूरच्या विकासासाठी आपले व्यक्तिश: लक्ष असून येथील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
सुमारे साडेबारा कोटी कराड मार्केट यार्ड-मलकापूर-नांदलापूर राज्य मार्ग ८०चे रुंदीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम होते. अर्थमंत्री जयंत पाटील, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मलकापूरच्या नगराध्यक्ष रूपाली कराळे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे आदींची या वेळी उपस्थिती होती.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की कराड मार्केट यार्ड ते नांदलापूर या सुसज्ज चौपदरी रस्त्यामुळे मार्केट यार्डमध्ये शेतीमाल आणणे सोयीचे होणार आहे. शिवाय वाहतुकीसाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. मलकापूरचा नगरविकास आरखडा तयार करण्यात आल्याने मलकापूर शहर एक रोल मॉडेल म्हणून नावारूपास येईल. मलकापूर शहरातील कराड मार्केट यार्ड-मलकापूर-नांदलापूर या रस्त्याचे १४.५ मीटरने रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी राज्य शासनाच्या बांधकाम विभागाकडून रस्ते व पूल विशेष देखभाल दुरुस्तीअंतर्गत १२ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2012 10:09 am

Web Title: in future malkapur will become role model cm
टॅग Karad
Next Stories
1 कोल्हापूर महापालिकेच्या सभेत काळम्मावाडी योजनेवरून गोंधळ
2 लोकमंगलच्या सामूहिक विवाह सोहळ्यात २६४ जोडपी विवाहबद्ध
3 पंचगंगा कारखान्याकडून सव्वीसशे रुपये उचल
Just Now!
X