News Flash

गोव्यात कोकण इतिहास परिषदेचे अधिवेशन

कोकण इतिहास परिषदेचे तिसरे अधिवेशन गोवा राज्यातील फोंडा येथे गोमंतक संवर्धन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येत्या २ आणि ३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. शासनाच्या

| January 30, 2013 12:55 pm

कोकण इतिहास परिषदेचे तिसरे अधिवेशन गोवा राज्यातील फोंडा येथे गोमंतक संवर्धन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येत्या २ आणि ३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक भास्करराव धाटांवकर अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
यंदा परिषदेतर्फे ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन विभागांत अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. अनुक्रमे डॉ. रिबसी, डॉ. जी. टी. कुलकर्णी आणि डॉ. मंजिरी कामत हे या विभागांच्या अध्यक्षस्थानी आहेत. कोकणचा इतिहास आणि संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारे शोधनिबंध या अधिवेशनात सादर केले जाणार आहेत. अधिवेशनात इतिहासविषयक उत्कृष्ट पुस्तकास रावबहादूर साठे पारितोषिक देण्यात येणार आहे.
गोमंतक संवर्धन संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, उपाध्यक्ष प्रा. भूषण भावे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. वर्षां कामत, महाराष्ट्रातून परिषदेचे अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी, उपाध्यक्ष रवींद्र लाड, सदाशिव टेटविलकर आदी जण अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. इतिहासप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. संपर्क- प्रा. भारती जोशी- ९९८७७८३८२३.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 12:55 pm

Web Title: kokan history parishad annual in goa
टॅग : Goa,Kokan
Next Stories
1 ठाण्यात अपुऱ्या वाहनतळांचा वाहतूक कोंडीवर भार
2 अपुऱ्या सार्वजनिक परिवहन सेवेमुळे वाढतोय पार्किंगचा फास..!
3 शहरांच्या नियोजनाला ‘पार्किंग चोरी’ची नाट
Just Now!
X