सोलापूर विद्यापीठ व डॉ. अनंत व लता लाभसेटवार चॅरिटेबल ट्रस्ट (नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अनंत व लता लाभसेटवार व्याख्यानमालेंतर्गत येत्या २४ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता सोलापूर विद्यापीठात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचे व्याख्यान आयोजिले आहे.
दिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कारानंतर तिच्या झालेल्या मृत्यूच्या पाश्र्वभूमीवर डॉ. धनागरे हे ‘लिंगभावावर आधारित स्त्री-पुरुष असमानता आणि सामाजिक विषमता’ या विषयावर विचाराची मांडणी करणार आहेत. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मनालदार हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. विद्यापीठाच्या सभागृहात हे व्याख्यान होणार असल्याचे कुलसचिव कॅ. डॉ. नितीन सोनजे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2013 रोजी प्रकाशित
सोलापूर विद्यापीठात डॉ. धनागरे यांचे व्याख्यान
सोलापूर विद्यापीठ व डॉ. अनंत व लता लाभसेटवार चॅरिटेबल ट्रस्ट (नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अनंत व लता लाभसेटवार व्याख्यानमालेंतर्गत येत्या २४ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता सोलापूर विद्यापीठात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचे व्याख्यान आयोजिले आहे.
First published on: 09-01-2013 at 04:59 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lecture of dr dhanagare in solapur university