‘लोकसत्ता’ यशस्वी भव अंतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने पोलादपूर व महाड तालुक्यांतील दोन शाळांमध्ये विद्यार्थासाठीचे मार्गदर्शन शिबीर पार पडले. वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कापडे बुद्रुक, ता. पोलादपूर येथे व शं. बा. सावंत माध्यमिक विद्यालय शिरगाव महाड येथे या दोन शाळांमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थासाठी मुख्यपरीक्षेची तयारी कशी करावी?, इंग्रजी व बीजगणित या विषयांचे सखोल मार्गदर्शन भोसले व देसाई यांनी केले. या मार्गदर्शन शिबिरातून विद्यार्थाना उपयुक्त माहिती मिळाली. गेले संपूर्ण वर्षभर हा उपक्रमसेंट्रल बँक ऑफ इंडिया व त्यांचे ठाणे विभागीय व्यवस्थापक सुनील चव्हाण यांच्या प्रयत्नाने सुरू होता. या शिबिरा वेळी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.