पैशांसाठी छळ करून येथील कॅम्प भागातील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी सासरच्या तिघांना अटक केली आहे.
उधना (सुरत) येथील माहेर असलेल्या शीतल राकेश नरोडे (२२) या विवाहितेने ११ फेब्रुवारीला सकाळी येथील मोची कॉर्नर भागातील घरी घासलेट ओतून पेटवून घेतले.
गंभीर अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु उपचार सुरू असतानाच रविवारी तिचे निधन झाले. शीतलच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळल्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे.
घर बांधण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणावेत, असा आग्रह सासरकडून करण्यात येत होता. पैशांसाठी सासरी तिचा छळही सुरू होता, असे तक्रारीत म्हटले आहे. कॅम्प पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पती राकेश नरोडे, सासू अवंताबाई आणि नणंद सारिका मराठे यांना अटक केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2015 6:46 am