भारताचे अवकाश यश सर्वश्रुत आहे. अवकाशातील विविध मोहिमा, उपग्रह, यान यांची माहिती विविध माध्यमांतून समोर येत असते. मात्र विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाची गोडी लागावी, त्याची माहिती व्हावी यासाठी संडे सायन्स स्कूल आणि पिनॅकल मॉल यांच्यातर्फे प्रजासत्ताक दिनी दुपारी १२ वाजता पिनॅकल मॉल येथे ‘माझे मंगलायन’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगलायन म्हणजे ‘मार्स ऑर्बिटर मिशन’च्या यशस्वीतेने भारतीय अंतराळ संशोधनात एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. या मोहिमेच्या यशातून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अंतराळ संशोधनाकडे वळावे यासाठी ‘माझे मंगळायन’ उपक्रम घेण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक विद्यार्थ्यांला ‘मंगळयान’ संच दिला जाईल. या संचातून सर्व विद्यार्थी स्वतच मंगळयानाची प्रतिकृती बनवतील. त्यात प्रक्षेपक पीएसएलव्ही-पोलर सॅटेलाईट लॉचिंग व्हेइकलची प्रतिकृती व ‘मार्स ऑर्बिटर’ अर्थात मंगलयानाची प्रतिकृती विद्यार्थी स्वत: बनविणार आहेत. यासोबत विद्यार्थ्यांना मंगळयान व मंगळयान मोहिमेच्या वैशिष्टय़ांबद्दल माहिती देण्यात येईल. उत्कृष्ट प्रतिकृती तयार करणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. या संदर्भात अधिक माहिती व नोंदणीसाठी विज्ञान प्रबोधिनी, ५९, प्रधान पार्क (तळमजला), एम.जी.रोड, नाशिक किंवा ९८२३११४७७२ या क्रमांकावर संपर्क साधावा.