प्रचलित पावनखिंड नाकारून मूळ पावनखिंड ही येळवण जुगाई गावच्या पाठीमागील डोंगरात असल्याची मांडणी करणारे संशोधन ‘शोध पावनखिंडीचा’ या डॉ. दीपक चव्हाण लिखित मंगळवारी प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये आहे. पावनखिंडीची शोधमोहीम राबवून सखोल अभ्यासाअंती लेखकाने ऐतिहासिक संदर्भाच्या आधारे पावनखिंडीचा संगर व तिची प्राकृतिकता यावर विविध अंगाने लेखन केले आहे. पावनखिंड शर्थीने लढणारे रणझुंजार नरवीर शंभूसिंग जाधवराव यांच्या कर्तबगारीची घेतलेली नोंद आणि गुरूवर्य भानुदास सूर्यवंशी यांच्या दृष्टिकोनातील मूळ पावनखिंड हे या पुस्तकाचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, ताराराणी यांच्या काळात पन्हाळा किल्ल्याचे स्थान अनन्यसाधारण राहिले आहे. पन्हाळा म्हटले की, सर्वप्रथम आठवते ती पावनखिंडची लढाई. ही लढाई कुठे कशाप्रकारे लढली गेली यावर आजपर्यंत अनेक बखरकार, इतिहास लेखक यांनी विपुल लेखन केले आहे. तथापि प्रस्तुत पुस्तकात मात्र प्रचलित खिंड नाकारणारे संशोधन लेखकाने केले आहे. इचलकरंजीच्या नाईट कॉलेजमध्ये प्राचार्य असलेले डॉ.दीपक चव्हाण हे १९८४ पासून किल्ले, गडकोटांची भ्रमंती करीत आहेत. शिवदुर्ग प्रेमी मंडळाच्यावतीने २७ मोहिमा पार पाडल्या असून एकंदरीत १०० हून अधिक मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. हाजी मलंग ते पणजी (गोवा) किनारपट्टीची पदभ्रमंती हे त्यांचे वेगळेपण आहे. याचवेळी गेली ३० वर्षे इतिहासातील विविध घडामोडींबाबत त्यांनी सातत्याने लेखनही केले आहे.

या लेखनातील वेगळेपण ‘शोध पावनखिंडीचा’ या पुस्तकाद्वारे घेताना प्रचलित पावनखिंड नाकारून मूळ पावनखिंड ही येळवण जुगाई गावच्या पाठीमागील डोंगरात कशी आहे हे सिध्द करते. अस्सल व दुय्यम साधन सामुग्रीचा आधार घेत हे संशोधन केले आहे. स्थानिक लोकांशी चर्चा करतांना डॉ.चव्हाण यांना असे समजले, की येळवण जुगाई हे गाव सध्या जिथे आहे तेथे ते नव्हते, तर ते हुंदळीच्या रानालगत होते. यामुळेच खिंडीच्या भौगोलिक पाश्र्वभूमीला एक वेगळे आयाम प्राप्त झाले आहे. या संशोधनाची माहिती ज्यांना समजली त्यांनी डॉ.चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना साधार खिंडीचे महत्त्व पटवून दिले. खरी पावनखिंड कोणती (प्रकरण ४) आणि पावनखिंडीची प्राकृतिकता (प्रकरण २, ५, ६) या प्रकरणामध्ये पावनखिंडी विषयीचे सविस्तर विश्लेषण घेतले आहे. ‘पावनखिंडीतील संग्राम नव्हे; गनिमी युद्ध’ या प्रकरणात त्यांनी टाकलेला प्रकाशझोत अभ्यासणासारखा आहे.    
पावनखिंडीच्या इतिहासाची नोंद घेतांना बाजीप्रभू आणि शिवा काशीद या नरवीरांना इतिहासकारांनी योग्य न्याय दिला आहे. पण सिध्दीच्या डिवचलेल्या, चवताळलेल्या सैन्याला आपल्या थोर पराक्रमाने थोपविणा-या आणि बाजीप्रभूंच्या अगोदर खिंडीत आत्माहुती देणा-या शंभूसिंग जाधवरावांना (संभाजी जाधव) न्याय देण्याचे काम पुस्तकातील पहिल्याच प्रकरणात लेखकाने केले आहे. शंभूसिंग जाधवराव हे सरसेनापती धनाजी जाधव यांचे वडील. थोर संशोधक य.खू.देशपांडे यांनी शंभूसिंग यांच्यावर त्रोटक पण महत्त्वाचे लिखाण केले आहे. पावनखिंडच्या लढाईत शंभूसिंग जाधवांनी कसा पराक्रम गाजविला याची माहिती या प्रकरणात सविस्तरपणे मिळते. यामुळे पावनखिंडीच्या इतिहासाला नवे पर्व गृहीत धरावे लागेल, असे मत लेखकाने नोंदविले आहे. इतिहासाचे पुनर्लेखन आणि पुनर्मांडणीची अपेक्षाही या निमित्ताने केलेली आहे. शिवदुर्ग मंडळाने राबविलेल्या दोन अभ्यास मोहिमांमध्ये भानुदास सूर्यवंशी यांनी केलेले मार्गदर्शन उल्लेखनीय ठरले आहे.
 

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट