News Flash

रजनीकांत यांच्याशी तुलना नको – धनुष

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी आपली तुलना करणे योग्य ठरणार नाही. त्यांचा जावई असलो तरी सिनेमासृष्टीत येण्यासाठी किंवा प्रस्थापित होण्यासाठी त्यांची मदत घेतली नाही वा कोणता

| June 19, 2013 08:44 am

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी आपली तुलना करणे योग्य ठरणार नाही. त्यांचा जावई असलो तरी सिनेमासृष्टीत येण्यासाठी किंवा प्रस्थापित होण्यासाठी त्यांची मदत घेतली नाही वा कोणता गैरफायदाही आपण कधीच घेतला नाही, असे ‘कोलावरी डी’फेम गायक-गीतकार आणि अभिनेता धनुषने स्पष्ट केले. रजनीकांतची कन्या ऐश्वर्या हिच्याशी २००४ साली धनुषचा विवाह झाला. स्वत:च्या हिमतीवरच आपण सिनेमासृष्टीत आलो असे धनुषने स्पष्ट केले.
रजनीकांत यांची अभिनयशैली, काम करण्याची पद्धत आणि माझी पद्धत यात जमीनअस्मानाचा फरक आहे. ते ‘आयकॉन’ आहेत आणि मी नवीन आहे. त्यामुळे त्यांच्याशी आपली तुलनाच होऊ शकत नाही, असे धनुष म्हणाला. ‘रांझणा’ या चित्रपटाद्वारे धनुष हिंदीत पदार्पण करतो आहे. आनंद एल राय हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांच्यासोबत आणखी एक हिंदी चित्रपट करणार असल्याचेही धनुषने जाहीर केले. ‘रांझणा’ या चित्रपटात सोनम कपूर-धनुष ही जोडी प्रथमच पडद्यावर दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 8:44 am

Web Title: not compared with rajnikanth sir dhanush
टॅग : Dhanush,Loksatta,News
Next Stories
1 एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार लवकरच लागू?
2 वाहतूक पोलिसांवर आता राहणार वरिष्ठांची नजर
3 पालिकेचे सारे दावे फोल!
Just Now!
X