शहरातील शिवाजी चौक परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाशी ओळख वाढवून त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची ४७ हजार ६०० रुपये किमतीची सोनसाखळी संशयिताने लंपास केली. या प्रकरणी शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वीही शहरात अशाच प्रकारच्या तीन घटना घडल्या आहेत. मात्र त्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनीही दक्षता घ्यावी, तसेच ज्येष्ठ नागरिक व महिलांनी आपल्याकडील मौल्यवान वस्तू अनोळखी व्यक्तींकडे देऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मंगळवारी दुपारी परशुराम मावरे (७०) हे एटीएममधून पैसे काढण्यासाठी शिवाजी चौकात आले होते. चौकात एका व्यक्तीने पाळत ठेवून त्यांच्याशी संपर्क साधला. ओळख वाढवली. तुमच्या गळ्यातील सोनसाखळी चांगली आहे. मलाही तसाच
बनवायचा आहे. त्यासाठी आपण खरेदीला जाऊ, असे सांगत त्याने मावरे यांच्या गळ्यातील सोनसाखळी स्वत:च्या हातात घेतली. नंतर मोबाइलवर बोलत असल्याचे भासवत फरार झाला.