News Flash

डिझेलच्या टाकीचा स्फोट, एक ठार

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एन्थोनी अ‍ॅटो कंपनीमध्ये मंगळवारी दुपारी एक वेल्डर मजूर ट्रेलरच्या खालच्या बाजूस वेल्डींग करताना डिझेलच्या टाकीला लागलेल्या आगीमुळे झालेल्या स्फोटात जळून खाक

| February 21, 2014 01:28 am

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एन्थोनी अ‍ॅटो कंपनीमध्ये मंगळवारी दुपारी एक वेल्डर मजूर ट्रेलरच्या  खालच्या बाजूस वेल्डींग करताना डिझेलच्या टाकीला लागलेल्या आगीमुळे झालेल्या स्फोटात जळून खाक झाला. ऋद्रेश गौड (वय २२) असे या मजूराचे नाव आहे.
मुळचा उत्तर प्रदेशचा राहणारा ऋद्रेश गेल्या तीन वर्षांपासून एन्थोनी कंपनीत काम करत होता. तळोजा पोलीसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कंपनीच्या आत ट्रेलरची दुरुस्ती करण्याआधी  डिझेलची टाकी रिकामी केली, असती तर हा अपघात टळला असता.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 1:28 am

Web Title: one dies in diesel tank blast in panvel
Next Stories
1 ‘देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वजा’चा अवमान
2 खारघर येथील व्हॅलीशिल्प गृहप्रकल्पात मध्यमवर्गीयांची फसवणूक?
3 स्वतंत्र जिने नसल्याने अपंग प्रवाशांचे हाल
Just Now!
X