29 September 2020

News Flash

‘नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे’

पुढील काळात नरेंद्र मोदींसारख्या जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहून केंद्र व राज्य सरकारने केलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात असे आवाहन आ. जयप्रकाश छाजेड यांनी

| June 15, 2013 02:37 am

पुढील काळात नरेंद्र मोदींसारख्या जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहून केंद्र व राज्य सरकारने केलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात असे आवाहन आ. जयप्रकाश छाजेड यांनी केले आहे. मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
आगामी काळातील आव्हानांना सामोरे जाण्याकरिता मजबूत संघटनची आवश्यकता असून पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी कामाला लागावे असे आवाहन आ. छाजेड यांनी केले आहे. अ‍ॅड. छाजेड यांनी आगामी काळात संघटना मजबूत करण्यासंबंधी सूचना दिल्या.
यावेळी महिला काँग्रेस शहराध्यक्षा वत्सलाताई खैरे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनिफ बशीर आदींनी मनोगत व्यक्त केले. आयोजक ब्लॉक अध्यक्ष अशोक गोसावी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जावेद इब्राहिम यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 2:37 am

Web Title: party workers should be ready to stop narendra modi
Next Stories
1 उड्डाणपुलाचे आज लोकार्पण
2 मनसेमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र- आ. वसंत गिते
3 नव्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीवर उतारा
Just Now!
X