सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याच्या पुनर्वापरासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व संशोधन संस्थेने (नीरी) विकसित केलेल्या ‘फायटोरीड’ या तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प विदर्भात तीन ठिकाणी उभारण्यात आले आहे. यामध्ये नागपुरातील महाराजबाग, म्यूर मेमोरिअल हॉस्पिटल आणि ब्राम्हणीतील प्रकल्पांचा समावेश आहे.  देशभर  ५० ठिकाणी असे या तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन सांडपाण्याचाच पुनर्वापर करण्यासंबंधी इतरही तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. तरी त्यातील तांत्रिक बाबींवर होणारा जास्तीचा खर्च कमी करून अशा पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांचेच विकेंद्रीकरण करून त्याचा शहर आणि ग्रामीण भागात एकाचवेळी उपयोग करणे फायटोरीडमुळे शक्य झाले आहे. तंत्रज्ञान वापरून विकसित होणाऱ्या प्रकल्पांचे विकेंद्रीकरण केल्यास लहान लाहन गावात किंवा शहरातील वस्त्यांमध्ये हे प्रकल्प उभारून पाण्याचा पुनर्वापर अधिक होऊ शकतो, असे नीरीतील संशोधनातून पुढे आले आहे.
भारतात साधारणत: ४० हजार दशलक्ष लिटर म्हणजे ६० लाख टँकर पाणी मोठय़ा शहरांमधून वाया जाते. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर होऊ शकेल, असे केवळ १० हजार दशलक्ष लिटर क्षमता असलेले प्रक्रिया केंद्र भारतात उपलब्ध आहेत. कारण आपल्याकडे ‘सेंट्रलाईज ट्रिटमेंट प्लँट’ उपलब्ध आहेत. दूरून एका ठिकाणी पाणी गोळा करून त्यावर प्रक्रिया करायची आणि नंतर ते वापरण्याजोगे करायचे यासाठी प्रचंड खर्च, वीज, पायाभूत सुविधा उपलब्ध असायला हवी. कारण सांडपाणी वाहून नेताना सर्वत्र सपाट जमीन असणे शक्य नाही. म्हणूनच या प्रकल्पांचे विकेंद्रीकरण होऊन कॉलनी किंवा त्या त्या भागात प्रकल्प उभारून त्यांच्यापुरताच सांडपण्याचा पुनर्वापर होऊ शकणारा प्रकल्प उभारणे शक्य आहे. त्यासाठी नीरीतील स्वच्छ औद्योगिक केंद्राचे प्रमुख डॉ. राजेश बिनीवाले यांनी ‘फायटोरीड’ हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ते म्हणाले, लंडन सारख्या शहरात पाण्याचा पाच- सहावेळा पुनर्वापर होतो. आपल्याकडे मात्र, एकदा उपयोगात आलेल्या पाण्याचा पुनर्वापरच होत नाही. फायटोरीडमुळे प्रकल्पाचा सुरुवातीचा खर्च इतर तंत्रज्ञानापेक्षा थोडा जास्त असला तरी दुरुस्ती आणि देखभालीचा कोटय़वधी रुपयांचा खर्च नंतर कमी होतो. ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना एकादा प्रकल्प उभारायला सुरुवातीला निधी मिळतो नंतर देखभाल दुरुस्तीसाठी खर्च मिळत नाही. त्यामुळेच ग्रामीण भागात या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्प उभारणे अधिक फायदेशीर ठरते आणि हा फायटोरीड प्लँट लावणे सहज शक्य आहे.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
udyog bhavan marathi news, udyog bhavan loksatta marathi news
‘उद्योग भवना’ची नऊ वर्षांनंतरही प्रतीक्षाच! विकासकाच्या इमारती मात्र विक्रीसाठी सज्ज, ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ पद्धतीत विकासक फायद्यात
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…