जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना शालेय शुल्क भरण्यासाठी पैसे नसतात. अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात देता यावा म्हणून, निधी उभारण्यासाठी महेश सेवा समितीने २७ मे रोजी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात प्रा. विसुभाऊ बापट यांचा ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
महेस सेवा समिती आदिवासी, दुर्गम, ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासासाठी कार्य करीत असते.   समितीने उस्मानाबाद जिल्ह्य़ातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची पुंजी दिली. दीड महिन्यापूर्वी झालेल्या गारपीटीने शेतकऱ्यांना मातीमोल करून टाकले आहे. त्यामुळे महेश सेवा समितीने डोंबिवली परिसरात फिरून शेतकऱ्यांसाठी निधी जमा केला होता.
या निधीचे समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी उस्मानाबादमधील आर्मी गावात जाऊन शेतकऱ्यांना वाटप केले.