लोकमान्य सेवा संघाच्या मा. दा. कोल्हटकर सांस्कृतिक शाखेतर्फे १० आणि ११ नोव्हेंबर रोजी विलेपार्ले येथे ‘पुलोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ज्योत्स्ना भोळे यांच्या जन्मशताब्दीवर्षांच्या निमित्ताने सायंकाळी सात वाजता ‘बोला अमृत बोला’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच संगीत संशय कल्लोळ या नाटकातील संगीतमय प्रवेश सादर केले जाणार आहेत. ११ नोव्हेंबर रोजी पुलंचे साहित्य, नाटक आणि संगीत यावर ‘आनंदयात्री पुल’ हा कार्यक्रम होणार आहे. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहात होणार आहे. रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.