उन्हाळ्याच्या सुटय़ांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी व प्रतीक्षा यादी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ०८२९६/०८२९५ क्रमांकाची नागपूर मार्गे पुणे-बिलासपूर-पुणे ही द्विसाप्ताहिक सुपरफास्ट प्रिमियम गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ०८२९६ क्रमांकाच्या पुणे-बिलासपूर सुपरफास्ट प्रिमियम स्पेशल द्विसाप्ताहिक गाडीचे पुणे येथून मंगळवारी ८ एप्रिलला व शनिवारी १२ एप्रिलला सायंकाळी ७.३० वाजता प्रस्थान होऊन बिलासपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता बिलासपूर येथे आगमन होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी ८.२० नागपूर येथे पोहचेल तर ८.३० वाजता प्रस्थान करेल.
०८२९५ क्रमांकाच्या बिलासपूर-पुणे सुपरफास्ट प्रिमियम स्पेशल द्विसाप्ताहिक गाडीचे बिलासपूर येथून सोमवारी ७ एप्रिलला व शुक्रवारी ११ एप्रिलला ९.१५ वाजता प्रस्थान होऊन पुणे येथे दुसऱ्या दिवशी ४.४५ वाजता आगमन होईल. या स्पेशल गाडीचे नागपूरला ३.४५ वाजता आगमन होऊन ३.५५ वाजता ती प्रस्थान करेल. या गाडीचा थांबा कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नागपूर, गोंदिया, दुर्ग व रायपूर या स्थानकावर राहील. या गाडीला एकूण २० कोच असून यात ३ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान व २ एसएलआर कोच राहतील.