इंडियन प्रीमियर लीग अर्थात, आयपीएलच्या क्रिकेट स्पध्रेसाठी सट्टेबाजी करीत असताना वणी पोलिसांच्या डी.बी. पथकाने काल रात्री १२ जणांना रंगेहाथ पकडले.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक विराणी टॉकीजजवळील मिनाज शेख याच्या निवासस्थानातील वरच्या मजल्यावर आयपीएल किक्रेट सामन्यासाठी सट्टा घेणे सुरूआहे, अशी माहिती वणी पोलिसांना मिळाल्यानंतर काल रात्री ८.४५ वाजताच्या दरम्यान ठाणेदार अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने छापा घातला. यात १२ आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून ४३ मोबाईल संच, एक लॅपटॉप, टीव्ही, सुटकेस, िपट्रर, कॅलक्युलेटर आदी १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपी  मिनाज शेख यांच्यासह शहजाद खान, सचिन पिदूरकर, प्रवीण आवारी, सय्यद जुनेद, गिरीश आडे, अजय धंदरे, राजू शिवरात्रीवार, मनोज तिरणकर, शेख जुनेद शेख रज्जाक, शेख मन्नू आदींना अटक केली. आज या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना एक दिवसाचा पोलीस रिमांड देण्यात आला.
ही कार्यवाही डी.बी. पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश उपाध्याय, जमादार खान, अशोक स्वामी, गजानन डोंगरे, गोपाल वाटकर, सुधीर पांडे आदींनी फत्ते केली.