News Flash

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारी कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन

दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांसाठी जिल्ह्य़ातील सरकारी व निसरकारी कर्मचारी एक दिवसाचे वेतन देणार आहेत. काल दुपारी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय

| February 14, 2013 02:09 am

दुष्काळी परिस्थितीतील  उपाययोजनांसाठी जिल्ह्य़ातील सरकारी व निसरकारी कर्मचारी एक दिवसाचे वेतन देणार आहेत. काल दुपारी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हा परिषद व महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जमा होणाऱ्या या निधीतुन ५ हजार लिटर क्षमतेच्या सिंटेक्सच्या टाक्या गेतल्या चादील व त्या टंचाईग्रस्त गावांना पुरवठा केलेल्या पाण्याच्या साठवणीसाठी दिल्या जाणार आहेत. राजपत्रित अधिकारीही एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देणार आहेत.
जि. प. कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सुभाष कराळे, आबा जागताप, एकनाथ ढाकणे, राजेंद्र मोरगे, अशोक कदम, रावसाहेब रोहकले, राजेंद्र निमसे, राजेंद्र शिंदे, विनायक कोल्हे, संजय ढाकणे, राजेंद्र जरे, मल्हारी कचरे, मच्छिंद्र
चिलवर, पोपट धामणे, अशोक काळापहाड, मेजर सुसरे, के. के. जाधव, सुहास धिवर, अरुण देवकर, सुरेश पाटेकर, जगन्नाथ ठोंबरे, गजानन हजारे, विट्ठल वाडगे
आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 2:09 am

Web Title: state level governament workers will giveing the one day salary to famine affacted
टॅग : Famine
Next Stories
1 सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस तत्पर- बकाळे
2 परीक्षा शुल्क घेणाऱ्या कॉलेजवर कारवाईची मागणी
3 प्रतापसिंह मोहिते भाजपच्या दिशेने?
Just Now!
X