29 February 2020

News Flash

इचलकरंजी नगरपालिका नगराध्यक्षपदी गोंदकर

इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सुप्रिया सुरेश गोंदकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी या पदासाठी गोंदकर यांचा एकमात्र

| November 23, 2012 08:49 am

इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सुप्रिया सुरेश गोंदकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी या पदासाठी  गोंदकर यांचा एकमात्र अर्ज उरल्याने त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. पालिका इतिहासात बिनविरोध निवड झालेल्या गोंदकर या पहिल्याच महिला नगराध्यक्षा ठरल्या.
 रत्नप्रभा भागवत यांचा १० महिन्याचा कालावधी संपल्यानंतर नवा नगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता सर्वानाच लागून राहिली होती. काँग्रेसकडून सुप्रिया गोंदकर, सुमन पोवार,  प्रमिला जावळे व बिस्मिला मुजावर यांच्या नावांची चर्चा होती. तर अखेरच्या टप्प्यात गोंदकर व  पोवार यांची नावे आघाडीवर आली. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले असताना पक्षनेते माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी गोंदकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि राष्ट्रीय काँग्रेसतर्फे त्यांचा एकमात्र अर्ज दाखल करण्यात आला.
शहर विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी ध्रुवती दळवाई यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. काँग्रेसकडून गोंदकर यांचे नाव निश्चित झाल्याने या निर्णयाला जणू संमतीच दर्शवित दळवाई यांचा अर्ज मागे घेतला आणि गोंदकर यांची निवड बिनविरोध ठरविली. निवडीनंतर प्रांताधिकारी ठोंबरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, मुख्याधिकारी नितीन देसाई यांनी नूतन नगराध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर शहर विकास आघाडीच्या वतीने जयवंत लायकर, अजितमामा जाधव, तानाजी पोवार, महादेव गौड आदींनी गोंदकर यांना शुभेच्छा दिल्या.
शहराला दैनंदिन पाणी पुरवठा व स्वच्छता यांना प्राधान्य देऊन नागरी समस्या दूर करण्याचा प्रयत्न आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात करणार असल्याची ग्वाही नूतन नगराध्यक्षा  गोंदकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्या म्हणाल्या, पालिकेला आर्थिक बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शासनाच्या विविध योजनांतून अनुदान आणून पालिकेची स्थिती भक्कम करण्याचा आपला प्रयत्न राहील. तसेच अनावश्यक खर्चाला फाटा देऊन काटकसरीने पालिकेचा कारभार चालविला जाईल. विशेषत: आरोग्य सेवा, रस्ते, दिवाबत्ती, २४ तास पाणी पुरवठा, हरित व सुंदर इचलकरंजी करू. भविष्यात स्वच्छतेच्या तक्रारीसुध्दा येणार नाहीत अशा पध्दतीने आपण कार्य करू असेही त्या म्हणाल्या.

First Published on November 23, 2012 8:49 am

Web Title: supriya gondkar become nagaradhyaksha of ichalkaranji nagarpalika
Next Stories
1 पाच तासाची बैठक, आयुक्तांचे सादरीकरण अन् कंटाळलेले अधिकारीं
2 घोले रस्त्यावरील हॉटेलची अनधिकृत बांधकामे पाडली
3 कार्तिकी यात्रेतील वारक ऱ्यांना सिलिंडरच्या वाढीव दराचा फटका
X
Just Now!
X