ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पांडे लेआऊटमध्ये १२ व १३ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती समारोह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रा. अशोक दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवारी १२ तारखेला सकाळी साडेसात वाजता पांडे लेआऊटमधील हनुमान मंदिरापासून प्रभात फेरी निघेल. आबालवृद्धांसह तपोवन शाळेचे दोनशे विद्यार्थी त्यात सहभागी होतील. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, आद्य शंकराचार्य, माँ शारदा देवी या चार व्यक्तिरेखा त्यात राहतील. लेझीम पथक राहील. महापौर अनिल सोले हिरवी झेंडी दाखवतील. नगरसेवक गिरीश देशमुख व पल्लवी श्यामकुळे याप्रसंगी उपस्थित राहतील.
रविवारी १३ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता पांडे लेआऊटमधील सांस्कृतिक सभागृहात भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय पदाधिकारी मुकुल कानिटकर यांचे ‘आजचा भारत आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार’ या विषयावर व्याख्यान होईल. नगरसेवक गिरीश देशमुख अध्यक्षस्थानी रहातील. दत्तात्रेय पाचखेडे, विजय उपासनी, किरण देशपांडे, बाबा भुताड पत्रकार परिषदेला उपस्थित
होते.