04 July 2020

News Flash

नांदेडात १६ लाखांची चोरी

शहराच्या मुख्य बाजारपेठेत विजय क्लॉथ सेंटर या दुकानाच्या मागील बाजूची भिंत तोडून चोरटय़ांनी सुमारे सहा लाखांचा ऐवज लुटला. वजिराबाद पोलिसांनी आधी हा गुन्हा खोटा असल्याचा

| January 12, 2014 01:15 am

शहराच्या मुख्य बाजारपेठेत विजय क्लॉथ सेंटर या दुकानाच्या मागील बाजूची भिंत तोडून चोरटय़ांनी सुमारे सहा लाखांचा ऐवज लुटला. वजिराबाद पोलिसांनी आधी हा गुन्हा खोटा असल्याचा आव आणला. परंतु सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाल्याने पोलीस तोंडघशी पडले.
मध्यरात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी या दुकानाच्या मागील बाजूस असलेली भिंत फोडून आत प्रवेश केला. दुकानातील किंमती कपडे व रोख रक्कम असा सुमारे १६ लाखांचा ऐवज लांबविला. सकाळी हा प्रकार लक्षात आला. दुकानाचे मालक काला यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. सकाळी चोरीची घटना घडल्यानंतर वजिराबाद पोलिसांनी हा तांत्रिक गुन्हा असल्याचा अंदाज व्यक्त केला. पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाल्याने वजिराबाद पोलीस तोंडघशी पडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2014 1:15 am

Web Title: theft of 16 lakhs crime trouble in police nanded
टॅग Nanded
Next Stories
1 नावीन्याच्या ध्यासातूनच उपेक्षितांची प्रगती शक्य- शिंदे
2 औरंगाबादेतून ४० हजार शिवसैनिक जाणार शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी मुंबईत ‘प्रतिज्ञा सभा’
3 दुधगावकरांना सेनेच्या उमेदवारीचे दरवाजे बंद!
Just Now!
X