News Flash

मनोहर जोशी यांची आज मुलाखत

कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त चांदोरी येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या वतीने २४ जून रोजी सायंकाळी पाच वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात लोकसभेचे

| June 24, 2014 06:52 am

कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त चांदोरी येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या वतीने २४ जून रोजी सायंकाळी पाच वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांची प्रकट मुलाखत होणार आहे. ‘मराठी तरूण आणि उद्योग व्यवसाय’ या विषयावर लेखक नंदन रहाणे हे मुलाखत घेणार असल्याची माहिती क. का. वाघ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. के. एस. बंदी, चांदोरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संतोष वाघ यांनी दिली.
काकासाहेब वाघ यांच्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कर्मवीरांच्या कार्याला प्रेरणा देण्याच्या हेतूनेच मनोहर जोशी यांच्यासारख्या व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जातात असे प्रा. बंदी, प्राचार्य वाघ यांनी सांगितले. वाघ शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमधून कर्मवीर महोत्सव, कर्मवीर क्रीडा महोत्सव, कर्मवीर एक्स्पो यासारखे विविध उपक्रम राबविले जातात. जिल्हा पातळीवर ‘कर्मवीर व्याख्यानमाला’ सारखा उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस असून वर्षभरातील प्रत्येक महिन्यात एक उपक्रम राबवून कर्मवीरांना आगळी-वेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याचेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2014 6:52 am

Web Title: today is manohar joshi interview
टॅग : Manohar Joshi,Nashik
Next Stories
1 महापालिकेतील शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी
2 ‘मविप्र’तर्फे ‘ऑलिम्पिक डे रन’
3 मनमाडमध्ये भारनियमनाविरोधात बंद
Just Now!
X