राज्यातील पोलीस ठाणे ऑनलाइन पद्धतीने कार्यरत होणार असून त्याच्या कामकाजाची प्रशिक्षण देणारी कार्यशाळा मंगळवारी येथे घेण्यात आली. विप्रो कंपनींतर्गत आयोजित केलेल्या कार्यशाळेत पोलीस अधिकारीव कर्मचारी सहभागी झाले होते.    
पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या कार्यशाळेवेळी विप्रो कंपनीच्या अधिकारी रेणू बिशत व प्रियांकासिंग यांनी कामकाज पद्धतीची माहिती दिली. या प्रणालीचा वापर केल्यामुळे कामकाजात गतिमानता येणार असून वेळेची काटकसर होणार असल्याचे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. गुन्ह्य़ांच्या माहितीचे संकलन करणे, माहिती वरिष्ठांना पाठविणे, त्याचा डेटा तयार करून ठेवणे ही कामे कशी करायची याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.    
या वेळी पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक सयाजी गवारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.