News Flash

प्रवास रजा सवलतीवर डल्ला, ७ शिक्षकांना अटक

प्रवास रजा सवलतीच्या नावावर शासकीय पैशावर डल्ला मारणाऱ्या त्या २० शिक्षकांपैकी ७ शिक्षकांना भंडारा पोलिसांनी अलीकडेच अटक करून १३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली

| May 7, 2013 01:48 am

प्रवास रजा सवलतीच्या नावावर शासकीय पैशावर डल्ला मारणाऱ्या त्या २० शिक्षकांपैकी ७ शिक्षकांना भंडारा पोलिसांनी अलीकडेच अटक करून १३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या शिक्षकांविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.  याप्रकरणी अटक केलेल्या शिक्षकांमध्ये दवडीपार येथील आदर्श हायस्कू लचे सहायक शिक्षक श्यामराव गावड, संजय सोनवने, संदीप वलके, कांता कामथे, प्रबोधिनी गोस्वामी, मारोती लांजेवार, राजेश धुर्वे यांचा समावेश आहे. या सातही शिक्षकांना त्यांच्या घरून अटक करण्यात आली, असे सहायक पोलीस अधीक्षक मनोज वाढीवे यांनी सांगितले. त्यानंतर प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांनी १३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान,  या २० शिक्षकांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने त्यांना जामीन नकारला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2013 1:48 am

Web Title: travel leave compansation grab by teachers arrest to seven teachers
टॅग : Bhandara,Teachers
Next Stories
1 जेरबंद बिबटय़ांना मायक्रोचिप बसविणार
2 अकोला बंद संमिश्र ; बारा कोटींचे व्यवहार ठप्प
3 अनिल देशमुखांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश?
Just Now!
X