आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील प्रत्येक मतदारसंघात १० कक्षांसाठी एक केंद्रप्रमुख याप्रमाणे २४ ते २८ केंद्रप्रमुखांची निवड करण्याविषयी येथील काँग्रेस समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश सचिव डॉ. हेमलता पाटील, शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते, नगरसेवक शाहू खैरे, वत्सलाताई खैरे आदी उपस्थित होते. बैठकीत आगामी विधानसबा निवडणूकीसाठी धोरणासंदर्भात चर्चा करण्यात आली. समन्वयकांनी मतदार संघातील प्रत्येक १० कक्षासाठी एक केंद्रप्रमुखाची नियुक्ती करावी अशी सूचना केली. एका विधानसभा मतदार संघामध्ये सर्वसाधारणपणे २४० ते २८० कक्ष असू शकतात. ही बाब लक्षात घेऊन साधारणपणे २४ ते २८ केंद्र प्रमुखांची नियुक्ती होणे अपेक्षित आहे. केंद्रप्रमुख त्या दहा कक्षामध्ये येणाऱ्या भागातील रहिवासी असावा, निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्षासाठी वेळ देणारा असावा, अशाच कार्यकर्त्यांची निवड केंद्रप्रमुख म्हणून करण्याची सूचना मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयक वर्षां शिखरे यांनी केली. बैठकीस अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अय्याजोद्दीन काझी, पंडितराव येलमामे, आकाश छाजेड, स्वप्नील पाटील, उल्हास सातभाई, नीलेश खैरे, अंजना खैरे आदी उपस्थित होते.