कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीसाठी निर्वाचन क्षेत्रानुसार मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ग्रामीण, लहान नागरी व मोठे नागरी या क्षेत्रांनुसार ही यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा हरकत, आक्षेप, चूक या संबंधाचा तपशील द्यावयाचा असेल तर त्यांनी १० जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी स्वरूपात म्हणणे सादर करावयाचे आहे, असे जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती यांनी कळविले आहे. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (निवडणूक) नियम १९९९ अन्वये ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच निर्वाचन क्षेत्रांनुसार कोल्हापूर जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद, कोल्हापूर महापालिका व जिल्ह्य़ातील सर्व नगरपरिषदा या ठिकाणी प्रकाशित करण्यात आल्या आहेत.