दिघा येथील कन्हैया नगर, इलठण पाडा, विष्णुनगर या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत होता. या भाागत मागील पाच दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने त्याचा संताप व्यक्त करण्यासाठी येथील महिला रहिवाशांनी दिघा विभाग कार्यालयावर सोमवारी हंडा-कळशी डोक्यावर घेऊन मोर्चा काढला.
पूर्वी या भागामध्ये २४ तास पाणीपुरवठा होत होता. पंरतु आता ५ तासदेखील पाणी येत नाही. कन्हैया नगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तोही वेळेत नसल्यामुळे रहिवासी वैतागले आहेत. विष्णुनगर, कन्हैया नगर, इलठण पाडा हा भाग डोंगरामध्ये येत असल्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने येतो. शुक्रवारी शटडाऊन असताना गुरुवारी पाच वाजल्यापासून पाणी येणे बंद झाले. शनिवार व रविवारदेखील पाणी न आल्याने रहिवासी संतापले होते.
यां सदर्भात विभाग अधिकारी गणेश आघाव यांच्याशी संपर्क साधला असता, निवडणुकीच्या कामासाठी मुख्यालयामध्ये आहे, मला मोर्चाबद्दल माहीत नाही. पण पाण्यासाठी मोर्चा आला असेल तर या भागातील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करून नागरिकांच्या प्रष्टद्धr(२२४)्नााची सोडवणूक करण्यात येईल. नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.