नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईत ६ अग्निशस्त्र आणि ५ काडतुसे यांसह त्रिकुटाला गजाआड केले आहे.
विनायक अ‍ॅँथोनी, दिनेश सिंग परिहार हे दोघे तर तळोजा पोलीस स्थानकाच्या हद्दीत बनावट रिव्हॉल्वर विक्रीसाठी शाहरुख आयुख शेख येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विशेष कारवाई करून या आरोपीकडून ६ अग्निशस्त्र आणि काडतुसे असा शस्त्रसाठा ताब्यात घेतला आहे. या आरोपींना २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.