ठिय्यांवरील मजुरांनाही एलबीटी आंदोलनाचा फटका बसत आहे. ठिय्यांवर सकाळी कामावर गेलेल्या मजुरांना दुपापर्यंत काम मिळत नसल्यामुळे त्यांना तसेच घरी परतावे लागत असल्याचे चित्र सर्वच ठिय्यांवर दिसू येत आहे.
एलबीटी विरोधातील सध्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांच्याही नाकीनऊ येऊ लागले. बांधकामाचे साहित्य शहरात मिळत नसल्याने बांधकामे देखील बंद आहे.  बांधकामे बंद असल्याने मजुरीचा भरुदड कशाला घ्यायचा या कारणामुळे शहरातील ८० टक्के बांधकामे बंद आहेत. सकाळी कामासाठी ठिय्यांवर जवळपास ३ हजार मजूर नियमितपणे हजर असतात. परंतु बांधकाम करणाऱ्या मजुरांची मागणीच नसल्याने बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून जवळपास ४० हजार मजुरांना याचा फटका बसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 पंचशील चौक, गिट्टीखदान, सक्करदरा, सतरंजीपुरा आदी ठिकाणी मजुरांचे ठिय्ये आहेत. या ठिय्यांवर पुरुष व स्त्री मजूर सकाळी आपले काम मिळेल या आशेने येत असतात. पंचशील चौकातील ठिय्यांवरील महिला मजूर कॉटन मार्केटमधील भाजीबाजारात काम मिळत असल्याने जात असल्याचे सांगण्यात येते तर काही महिला पाणी वाटपासाठी आठवडी बाजारात असल्याचे चित्र दिसत आहे. तर काही पाणी पाऊच विकून उदरनिर्वाह करत आहेत. शहरात सर्वत्र एलबीटीमुळे हाल होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ठेकेदाराच्या हाताखाली काम करत असून आम्ही रोज या ठिय्यावर येतो, पण जवळपास १० दिवस झाले तरी काम नाही. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना आमच्या परिवाराला करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया मजुरांनी व्यक्त केली.  शहरातील जवळपास सर्वच ठिकाणी ही परिस्थिती आहे. इतवारी, गांधीबाग, कळमना या ठिकाणी व्यापारपेठा जवळ असल्याने तेथे आल्यावर मजुरांना काम ळित असे, पण आता मात्र बाजारपेठा बंद असल्याने मजुरांची मागणी कमी झाली आहे.
बाजार बंद असल्याने बांधकाम साहित्य उपलब्ध होत नसल्याने बांधकामे बंद आहे. याचा फटका जवळपास ४० हजार पेक्षा जास्त मजुरांना बसत असल्याचे सूत्राकडून
समजले.