विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या सूचनेनुसार नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत िहगणा पंचायत समितीच्या वतीने िहगणा येथे बुधवारी पाणी प्रदूषणाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला.
    काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवि बुद्धीराजा यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बठक झाली होती. या सभेत नागनदी, पिवळी नदीच्या अनुषंगाने चर्चा झाली. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या गावांनाही दूषित पाण्याचा फटका बसतो. यावर उपाययोजना व जनजागृतीच्या दृष्टीने कार्यशाळा घेण्याचे सूचित करण्यात आले होते. आजच्या कार्यशाळेला वक्तयांनी मार्गदर्शन केले.
    यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गोतमारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, जिल्हा परिषद सदस्य अंबादास उके, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे संध्या गोतमारे यांनी संबंधितांना मार्गदर्शन करताना सांगितले. ग्रामपंचायत डिगडोह, वानाडोंगरी आणि निलडोह येथील सांडपाणी व्यवस्थापनाबरोबरच औद्योगिक प्रदूषण तसेच लोकसंख्या वाढीचा प्रश्न बिकट असल्याचे मार्गदर्शन करताना वासुदेव भांडारकर यांनी यावेळी सांगितले.
    कार्यशाळेला मार्गदर्शन करताना गृहविकास अधिकारी संजय वानखेडे म्हणाले की, ग्रामपंचायत डिगडोह, वानाडोंगरी आणि निलडोह येथील एमआयडीसी औद्योगिकरणामुळे येथील दूषित पाणी वेणा नदीच्या पात्रामध्ये सोडल्या जाते. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी विशेष यंत्रणा स्थापन करण्यात यावी, असे मत अमरावती येथील महाराष्ट्र प्राधिकरणचे शाखा अभियंता मोहम्मद शाबीर यांनी व्यक्त केले. ग्रे वाटरवर शुद्धीकरणाद्वारे प्रक्रिया करून ते पाणी शेती, फळझाडे तसेच कपडे धुण्यासाठी उपयोगात आणले जाऊ शकते, अशी माहिती सुलभ इंटरनॅशनल सोशल सíव्हस ऑर्गनायझेशनचे श्याम पांढरीपांडे यांनी दिली. संचालन पंचायतचे विस्तार अधिकारी सुभाष सानप,
    तर आभार आर.के. परतेकी यांनी मानले.