सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त लेझीम या खेळाचा विश्वविक्रम प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर शिवाजी क्रीडांगणावर नोंदविण्यात आला. या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्याचा बहुमान हजारो सांगलीकरांना लाभला.
सांगली शिक्षण संस्थेच्या ठिकठिकाणी असणा-या १८ शाळांतील ७ हजार २०० विद्यार्थ्यांनी लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक करून विश्वविक्रमाची नोंद केली. ७ मिनिटांच्या खेळाची नोंद या विक्रमासाठी ठेवण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर, उपाध्यक्ष जनार्दन लिमये यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी यासाठी उपस्थित होते.
महालेझीमचा कार्यक्रम शिवाजी स्टेडियमवर सकाळी ९ वाजता सुरू करण्यात आला.  सांगली शिक्षण संस्थेच्या सांगली, तासगाव, विटा, लेंगरे आदी ठिकाणी असणा-या शाखांतील ७ हजार २०० विद्यार्थी महालेझीमच्या विक्रमासाठी उपस्थित होते. लेझीमचे चार डाव आणि तीन रचना अशा ७ मिनिटे चालणा-या प्रात्यक्षिकासाठी जूनपासूनच संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी प्रयत्नशील होते. हरिहर भिडे हे कार्यक्रम प्रमुख म्हणून कार्यरत होते.
——
१) फोटो – २७ एसएनजी १, फोटो – २७ सॅट १, ४, फोटो – २७ कोल २