पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने येत्या तीन मार्च रोजी जिल्ह्य़ातील सर्व न्यायालयात महा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एक लाख तेरा हजार खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले आहेत. या महा लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व खटले निकाली काढण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा न्यायाधीश व्ही.जी. जोशी यांनी दिली.
महा लोकअदालतीमध्ये तब्बल ९१ हजार दाखलपूर्व खटले ठेवण्यात आले आहेत. खटले निकाली काढण्यासाठी शिवाजीनगर न्यायालयात ९० पॅनलची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक पक्षकारांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा न्यायालयात सध्या तीन लाख २५ हजार खटले प्रलंबित आहेत. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या महा लोकअदालतीमध्ये एक लाखाहून अधिक खटले निकाली काढण्यात आले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त खटले तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. के. मलाबादे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2013 रोजी प्रकाशित
महालोकअदालतीमध्ये येत्या रविवारी तडजोडीसाठी एक लाख १३ हजार खटले
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने येत्या तीन मार्च रोजी जिल्ह्य़ातील सर्व न्यायालयात महा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एक लाख तेरा हजार खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले आहेत.
First published on: 02-03-2013 at 03:32 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 lac 13 thousand cases in big people court