नवीन वर्षांच्या मुहूर्तावर साईबाबांना एका अज्ञात भाविकाने सोन्याची निरंजन (धुपारती) अर्पण केली आहे. या सोन्याच्या निरंजनाचे वजन ४७४ ग्रॅम असून तिची किंमत पंधरा लाख रुपये आहे.
या निरंजनावर अतिशय आकर्षक व सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे. एका अज्ञात भाविकाने साई समाधी मंदिरातील दानपेटीत हे गुप्तदान अर्पण केले आहे. आज साई समाधी मंदिरातील दानपेटी उघडली असता हे निरंजन आढळून आले. नवीन वर्षांची सुरुवात साईंच्या दर्शनाने करण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. तेव्हाच या अज्ञात भाविकाने साईंना ही नवीन वर्षांची सुवर्णभेट अर्पण केली. सोन्याच्या किमती दिवसेंदिवस
गगनाला भिडत असतानाही
साईचरणी अर्पण होणाऱ्या सुवर्ण दानावर कोणताही परिणाम झालेला दिसत
नाही.